राज्यात दोन मोठे प्रकल्प येणार, केंद्र सरकारच्या वतीने घोषणा

सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (15:17 IST)
महाराष्ट्रात आता दोन मोठे प्रकल्प  येणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे. पुण्यात 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या दोन कंपनी पुण्यात गुंतवणूक करणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली आहे.
 
इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ही कंपनी 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे. तर CDAC ही कंपनी 1 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.  त्यामुळे एकूण 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक या दोन कंपनी पुण्यात करणार आहेत.
 
सध्या अनेक प्रकल्प राज्याबाहे गेल्यानंतर आता महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे. दोन प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक तरूणांना रोजगार मिळणार आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती