मुंबई-पुणे महामार्गावर रस्त्याच्या मधोमध एक सिमेंटचा टँकर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी उभा होता. मुंबईच्या दिशेने वेगाने येणारी खासगी बस या टँकर ला धडकली. या पाठोपाठ दोन अन्य वाहने देखील या बसला जाऊन धडकली. या अपघातात रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांपैकी तिघांचा मृत्यू झाला. या धडकेत बस चालक गंभीर जखमी झाला असून 15 बस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.