पुण्यात मालकाला गुंगीचे औषध देऊन चोरी करणाऱ्या नोकरासह तिघांना अटक

शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 (15:18 IST)
मालकाला गुंगीचे औषध देऊन चोरी करणाऱ्या नोकरासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून दागिने आणि वाहनांसह एकूण 8 लाखाहून अधिकचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 
 
रफिक असे आरोपी नौकराचे नाव आहे. रफिक हा थेरगावात एका 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांकडे चालक म्हणून कामाला होता या ज्येष्ठ नागरिकांना रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार आहे. त्यांना औषध देण्याच्या बहाण्याने आरोपी त्यांना गुंगीचे औषध द्यायचा आणि घरातून ऐवज चोरून न्यायचा.सदर घटना ऑगस्टची आहे. आरोपी रफिकच्या विरुद्ध पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत वाहन चोरीचे सात गुन्हे दाखल केले आहे. 
रफिकच्या सह निलेश गायकवाड आणि ईश्वर पवार या दोघाना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रफिक निलेश आणि ईश्वर सह चोरी करायचा. 

रफिक कडे असलेली दुचाकी देखील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांनी एकत्रपणे एकूण तीन वाहने चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. निलेश पुणे ग्रामीण हद्दीत वाहन चोरी, घरफोडी, जबरीचोरी आणि दरोडा असे एकूण 34 गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. 
Edited By - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती