सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार्‍यांचे पालिका करणार लसीकरण

शुक्रवार, 2 जुलै 2021 (22:50 IST)
पुण्यात महापालिकेच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार्‍यांसाठी राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरीक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असलेल्या व्यापार्‍यांचे दुकानात जावून लसीकरण करण्यात येणार आहे.
 
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शहरात कोरोना प्रतिबंधीत लसीकरण हाती घेण्यात आले आहे. सुरूवातीस आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी व अधिकार्‍यांना, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि आता 18 वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने यासाठी शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली असून खासगी रुग्णलयांमध्ये लसीकरणाची व्यवस्था आहे. याशिवाय दिव्यांग, रस्त्यांवरील नागरिक, आणि झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
 
मात्र कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असल्याने सुपरस्प्रेडर ठरणार्‍या नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार्‍यांचे व त्यांच्या नोकरांचे दुकानातल जावून लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहिम गुरुवार पासून लसीच्या उपलब्धतेनुसार राबविली जाणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती