न्याहारीसाठी बनवा भाताच्या पुऱ्या

शुक्रवार, 2 जुलै 2021 (22:17 IST)
कधी कधी रात्रीचा भात शिल्लक राहतो.बऱ्याच वेळा आपण त्या भाताला फोडणी देऊन खातो.परंतु आपण त्या शिळ्या भातापासून न्याहारीसाठी चविष्ट आणि गरम पुऱ्या देखील बनवू शकता.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या.
 
 
साहित्य-
 
1 कप भात शिजवलेला,1 चमचा तिखट,मीठ चवीप्रमाणे,2 कप गव्हाचं पीठ, तेल तळण्यासाठी.
 
कृती- 
भातात तिखट,मीठ मिसळून भाताचं सारण बनवा आणि गव्हाच्या पिठाची कणिक मळून घ्या.आता या कणकेचे लहान लहान गोळे बनवून  त्याला पोळी प्रमाणे लाटून त्या लाटलेल्या पोळीत भाताचे सारण भरून त्याला सगळी कडून बंद करून पुरी प्रमाणे लाटा.
आता एका कढईत तेल तापत ठेवा आणि या पुऱ्या तेलात तळून घ्या.भाताची चविष्ट पुरी तयार.ही पुरी चटणी किंवा सॉस सह सर्व्ह करा.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती