बॉयफ्रेंड बनवण्याच्या उतावळेपणा नडला, बसला तब्बल 73 लाखांचा चूना

शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (22:10 IST)
पुण्यातून ऑनलाइन फ्रॉडची एक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने तरुणीला 73 लाख रुपयांचा चूना लावला आहे. एका डेटिंग वेबसाइटवर दोघांची भेट झाली होती. तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरूद्ध तक्रार दाखल  केली आहे.
 
पीडित तरुणी पुण्यातील वाकड परिसरात राहते. याच वर्षी जूनमध्ये डेटिंग वेबसाइटवर तरुणीची एका तरुणासोबत भेट झाली होती. यानंतर दोघांनी आपसात नंबर एक्सचेंज केला आणि WhatsApp वर चर्चा शुरू झाली. काही दिवसांपर्यंत दोघांमध्ये चर्चा सुरू होती आणि नंतर दोघांमध्ये प्रेम झाले. मुलाने तरुणीला सांगितले की तो परदेशात राहतो. त्याला लवकर भारतात सेटल व्हायचे आहे. तरुणाने तरुणाला हे सुद्धा आश्वासन दिले की तो तिच्याशी लग्न करणार आहे. तरुणीचा सुद्धा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. नंतर एक दिवस मुलाने मुलीला फोन केला आणि म्हटले की मी एयरपोर्टवर आहे. कस्टम डिपार्टमेंटने मला पकडले आहे.माझ्याकडे 1 कोटी रुपये आहेत. जर मी दंड भरला नाही तर माझ्याविरूद्ध केस दाखल होईल. बॉयफ्रेंड संकटात सापडल्याचे पाहून मुलीने वेगवेगळ्या अकाऊंटवरून 73 लाख रुपये ट्रान्सफर केले आणि मुलाला विश्वास दिला की त्याला काहीही होणार नाही.पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तरुणाने तरुणीशी संपर्क बंद केला. यानंतर तरुणीने त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती