पुण्यात स्टेटस वरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात भयानक राडा

बुधवार, 25 जानेवारी 2023 (13:32 IST)
पुण्यात उरळी कांचन येथे ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात विद्यार्थ्यांनी लोखंडी रॉड, काठ्या, हॉकी स्टिक ने एकमेकांना मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी दिनही गटाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

वृत्तानुसार, उरळी कांचन येथील पदमश्री मणिभाई देसाई ज्युनिअर कॉलेज मध्ये 12 वी च्या विद्यार्थ्यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना चिडवणारे स्टेट्स ठेवले होते. या स्टेट्सवरून दोघांमध्ये संताप होता. कॉलेजमध्ये त्यांनी एकमेकांना स्टेट्स बद्दल विचारणा केली असता दोन्ही गटात वाद झाला आणि त्या वादाचे रूपांतरण हाणामारीत झाले. विद्यार्थ्यांनी एकमेकांना लोखंडी रॉड, काठ्या, हॉकी स्टिकने मारहाण केली. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.दोन्ही गटांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकमेकांनी तक्रार दाखल केली असून दोन्ही गटांतील 11 जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती