मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी सीएचा अभ्यास करत होती. तिने सीएची परीक्षा दोन वेळा देऊन देखील तिला अपयश मिळाले. तिने हिम्मत राखून पुन्हा तिसऱ्यांदा सीएची परीक्षा दिली. सीएचा निकाल आल्यावर तिला तिसऱ्यांदा पुन्हा अपयश हाती आले. ती कोलमडून गेली आणि घरात कोणाशीही बोलली नाही. आज सकाळी तिने चिंचवड मधील केशवनगर या ठिकाणी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. चिंचवड पोलीस तपास करत आहे.