बाप्परे, प्रेम प्रकरणातून आत्महत्या, ४ जणांवर गुन्हा

गुरूवार, 29 एप्रिल 2021 (20:57 IST)
आपली मुलगी प्रेम विवाह करणार हे समजल्यावर प्रेम करत असलेल्या पुणे येथील मुलीच्या नातेवाईकांनी नेवासा येथील तरूणाला मारहाण केली.तसेच त्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.त्यामुळे घाबरून जाऊन त्या तरूणाने राहुरी तालूका हद्दीत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे पुणे येथील चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
 
सुरेश कांतीलाल गायकवाड वय २५ वर्षे राहणार मक्तापुर ता. नेवासा. या तरूणाने दिनांक २५ एप्रिल रोजी राहूरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड महामार्गा लगतच्या एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
 
याबाबत राहुरी पोलिसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर मयताचे वडिल कांतीलाल शामराव गायकवाड राहणार मक्तापूर ता. नेवासा. यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि,मयत सुरेश कांतीलाल गायकवाड याचे पुणे येथील एका मुलीशी प्रेम संबंध होते.ते दोघे लग्न करणार होते. याबाबत त्या मुलीच्या घरच्या लोकांना माहीती मिळाली. त्यानंतर त्यांनी आपसात संगणमत करुन मयत सुरेश याला मारहाण करुन त्यास
 
घरातुन काढुन दिले व फोन करुन तूझे व आमच्या मुलीचे संभाषण तूझ्या फोनमधुन डिलीट कर.असे बोलून नेहमी शिवीगाळ करुन त्याला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याला मानसिक त्रास देत होते.त्यामुळे सुरेश याने आरोपींच्या त्रासाला कंटाळून दिनांक २५ एप्रिल रोजी राहुरी पोलिस ठाणे हद्दीत राहुरी फॅक्टरी परिसरात एका शेतात असलेल्या झाडाला.गळफास घेऊन आत्महत्या केली.
 
कांतिलाल शामराव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी १) राजु बिभीषन वाघमारे २) उज्वला राजु वाघमारे ३) स्वाती राजेंद्र मोरे सर्व राहणार कोंढवा हाँस्पीटल जवळ येवलेवाडी ता. हवेली जिल्हा पुणे ४) योगेश मोतीलाल गायकवाड राहणार मक्तापुर ता. नेवासा या चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती