पुण्यात रिक्षाचा प्रवास पहिल्या दीड किलोमीटरसाठी दोन रुपयांनी महाग होणार आहे. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामती शहरात नवे दर लागू होणार आहेत. पुणे आरटीओने रिक्षाच्या दरवाढीस मंजुरी दिली आहे. नवी दरवाढ ८ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. सध्या पहिल्या दीड किलोमीटरसाठी १८ रुपये घेतले जात आहेत. आता त्यासाठी २० रुपये मोजावे लागणार आहे. तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १२.१९ रुपयांऐवजी १३ रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ सहा वर्षानंतर झाली आहे.