Pune : पुणे स्थानकावरील पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

शनिवार, 1 जुलै 2023 (18:45 IST)
Pune Viral Video :  सध्या पुणे स्थानकावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एक पोलीस कर्मचाऱ्याचा आहे. पुणे रेल्वे स्थानक नेहमी प्रवाशांनी गजबजले असते. सध्या पुणे रेल्वे स्थानकावर पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या प्रकारचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया येत आहे. तसेच रेल्वे अधिकाऱ्यांची नाराजी व्यक्त होत आहे. 
 
व्हिडीओ मध्ये दिसत आहे की रेल्वे स्थानकावर काही प्रवाशी झोपले आहे. झोपलेल्या प्रवाशांना उठवण्यासाठी पोलीस कर्मचारी त्यांच्या तोंडावर बाटलीने पाणी ओतत आहे. सदर प्रकारामुळे प्रवाशी झोपेतून दचकून जागे होतात. रूपेन चौधरी या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून ट्विट मध्ये त्याने "RIP मानवता पुणे स्टेशन". असे लिहिले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती