ड्रग्ज माफिया ललित पाटील ला काही दिवसांपूर्वी पुण्यातील चाकण भागातून ड्रग्ज तस्करी करताना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात झाली. तेथून त्याने कारागृहातील कमर्चाऱ्यांच्या साहाय्याने पोटाचा विकार असल्याचा बनाव रचून ससून रुग्णालयात तीन महिन्यांपूर्वी दाखल झाला असून तो तेथून ड्रग्जचे रॅकेट हाताळायचा. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी सापळा रचून दोन कोटींचे अम्लीय पदार्थासह रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आणले.