पुणे महानगरपालिका मुख्यालयातील 45 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये अँटीबॉडीज

शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (09:27 IST)
राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या मुख्य केंद्रापैकी एक असणाऱ्या पुण्यात काही भागांतील नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचाही अंदाज नुकताच तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता. पुणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातही तसेच दिसत आहे. येथील 45 टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होऊन त्यांच्या शरीरात आपोआपच अँटीबॉडीज निर्माण झाल्याची बाब आता समोर आली आहे. 
 
‘एनआयव्ही’कडून गेल्याच आठवड्यात पुणे महानगरपालिका मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 45 टक्के कर्मचाऱ्यांना कोरोना होऊन ते आपोआप बरे झाल्याची बाब समोर आली. गेल्या आठ महिन्यांमध्ये महापालिकेच्या तब्बल 638 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 38 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. 
 
पुणे शहरात15 दिवसांत शहरातील कंटेन्मेंट झोनची संख्या कमी झाली आहे. कसबा पेठ, आंबेगाव, वानवडी, लोहगाव, फुरसुंगी आणि हडपसर हे भाग वगळता इतर परिसरात कंटेन्मेंट झोनची संख्या कमी करण्यात आली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती