पुण्याच्या एटीएसने लष्कर - ए - तोयबाच्या अतिरेक्याला उत्तरप्रदेशातून अटक केली

सोमवार, 13 जून 2022 (17:49 IST)
लष्कर ए तोयबा या संघटनेत काम करणाऱ्या एका दहशतवादीला राज्य दहशत विरोधी पथकाने उत्तरप्रदेशच्या सहारनपूर येथून अटक केली आहे.इनामुल हक असे या अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या आधी एटीएस ने पुण्यातील दापोडी येथून दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या दोन दहशवादींना अटक केली होती. जुनैद महंमद (वय 28, सध्या रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर,खामगाव, बुलढाणा) आणि आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह(वय 28, रा. किश्‍तवाड, जम्मू-काश्‍मीर) असे यांची नावे आहेत. त्यांच्या कडून पथकाने आठ मोबाईल जप्त केले होते. इनामुल हा जुनैद मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा च्या संपर्कात होता. इनामुल हा मूळचा उत्तरप्रदेशाचा आहे.या पूर्वी एटीएस ने बुलडाण्यातील जुनैद ला अटक केली होती.जुनैद हा सोशल मीडियावरून लष्कर ए तोयबा च्या संपर्कात आला होता. जुनैदला काश्मिरातील अतिरेकी संघटना गझवाते आलं हिंद कडून त्याच्या खात्यात 10 हजार रुपये देण्यात आले होते. हे पैसे त्याला कोणत्या कारणास्तव देण्यात आले होते अद्याप हे कळू शकले नाही. त्या पैशातूनच त्याने शस्त्र खरेदी केले होते. तसेच, जुनैदने त्याला मिळालेल्या पैशातून नवीन मोबाईल घरेदी केला होता. त्यानंतर जुनैदने फेसबुकवर बनावट खाते तयार केले होते
 
तसंच इनमुलदेखील जुनैदप्रमाणेच वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना दशहतवादाकडे ओढला गेल्याचे समोर आले आहे. आरोपी हा मूळचा झारखंडचा राहणार आहे .त्याला न्यायालयाने 24जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तो आरोपी हा जुनैदच्या संपर्कात होता. त्याचबरोबर हा आरोपी पाकिस्तानातील उमर नावाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचं देखील पोलीस सांगत आहे
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती