Pune : कारचा धक्का लागल्याने वादातून भररस्त्यात तरुणाची हत्या

बुधवार, 13 डिसेंबर 2023 (20:03 IST)
भरधाव कारचा धक्का लागल्यामुळे झालेल्या वादातून भर रस्त्यात खून केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगीत मंगळवारी घडली आहे. अभिषेक संजय भोसले(30) राहणारे शेवाळवाडी मांजरी, पुणे सोलापूर असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी 7 -8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अभिषेक भोसलेंच्या भाच्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,अभिषेक भोसले हे आपल्या स्विफ्ट कारने संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास शेवाळवाडी येथून जात असताना त्यांची कार आरोपी विलास सकट यांच्या कारला घासली गेली. या वरून आरोपी विलास आणि मयत अभिषेक यांच्यात वाद झाला. भोसले यांच्या कारचे नुकसान या मध्ये झाले.

त्याची भरपाई देण्यासाठी अभिषेक ने विचारले असता त्यांच्यात वाद झाला आणि विलास आणि त्यांच्या साथीदारांनी तीक्ष्ण शस्त्राने अभिषेकवर वार केला आणि बेदम मारहाण केली. त्यात अभिषेक यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असून एकाला अटक केली आहे. इतरांचा शोध पोलीस घेत  असून पुढील तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती