1972 च्या दुष्काळानंतर अनेक कुटुंबे पिंपरी-चिंचवडमध्ये स्थलांतरित झाली आणि त्यांनी येथे आपले जीवन उभे केले. मात्र एवढी वर्षे राहूनही त्यांना आजही स्थानिक म्हणून स्वीकारले जात नसल्याचे ते म्हणाले. ही निवडणूक स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यावर लढवली जाणार असल्याचे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टोला लगावला आहे. ते म्हणाले अजित पवार पिंपरी चिंचवडचे नसून बारामतीचे आहे. हे लक्षात ठेवावे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावरही टीका केली. काँग्रेसमधील अनेक स्थानिक नेते केवळ नावापुरते काँग्रेसमध्ये असून, त्यांच्या राजकीय विचारांची दिशा भाजपकडे असल्याचा आरोप त्यांनी केला.