मिळालेल्या माहितीनुसार, मयत मेढे यांना दारूचे व्यसन होते. गुरुवारी रात्री दारू प्यायल्यानन्तर त्यांनी कुटुंबियांना त्रास देण्यास सुरु केले. त्यांना अस्वस्थता जाणवल्यावर कुटुंबीयांनी ससून रुग्णालयात दाखल केले.तिथे त्यांच्यावर उपचार सुरु झाले.
शुक्रवारी सकाळी 7 :30 वाजेच्या सुमारास मेढे यांनी ससून रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.