जो चांगलं काम करेल त्यालाच तिकीट मिळणार : राज ठाकरे

सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (08:44 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील महापालिका निवडणुकीसाठी पक्षबांधणीला सुरुवात केलीय. राज ठाकरेंनी पुण्यातील मनसे शाखाध्यक्षांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात  मार्गदर्शन करत शाखाध्यक्ष झालात म्हणजे तिकीट मिळालं असं नाही, जो चांगलं काम करेल त्यालाच तिकीट मिळणार असं राज ठाकरे म्हणाले.
 
यावेळी शाखाध्यक्ष झालात म्हणजे तिकीट मिळालं असं नाही, जो चांगलं काम करेल त्यालाच तिकीट मिळणार, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांचा प्रत्येक महिन्याचा कामाचा अहवाल मागवला आहे.चांगली प्रतिमा ठेवा आणि लोकांमध्ये जावा,अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 
 
निवडणुका स्थगित ठेवल्या पाहिजे.पण काम पटकन होणार असेल तर स्थगिती मान्य आहे.सरकारच्या फायद्याचं असेल म्हणून आता निवडणुका घेतल्या जात नसतील. यात काही काळंबेरं असेल तर तेही समजून घ्यायला पाहिजे. सरकारलाच या निवडणुका नको आहेत आता. कारण नंतर सरकारच महापालिका चालवणार.कारण त्यावर प्रशासक नेमणार आणि सरकारच सर्व काम बघणार.हे सर्व उद्योगधंदे सरकारचे चालू आहेत. नुसता ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही साध्य करतेय असं नको. पण जनगणना वगैरे झाल्यावर निवडणुका घ्यायला काही हरकत नाही, असं राज म्हणाले. सरकारकडे यंत्रणा आहे. त्यामुळे मनात आणलं इम्पिरिकल डेटा किंवा जनगणना हे सर्व होऊ शकतं. ती काही कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती