महापालिका उभारणार महात्मा फुले सृष्टी

सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (15:55 IST)
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या शेजारी महात्मा जोतिराव फुले स्मारक येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा, फुले सृष्टी उभारण्यात येणार आहे. फुले सृष्टीच्या माध्यमातून महात्मा फुले यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्याची माहिती देण्याच प्रयत्न केला जाणार आहे.
या कामाचे भूमिपूजन राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते उद्या (मंगळवारी) सकाळी 11 वाजता होणार आहे. शहरात सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा नाही. स्त्री शिक्षणाची जननी म्हणून सावित्रीबाईंचे कार्य अनमोल आहे. सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा विशेषतः महिला वर्गास प्रेरणादायी ठरेल. शहराच्या नावलौकिकातही भर पडणार आहे. पुतळ्याच्या बाजूस जिना व लिफ्ट असणार आहे.
पुतळ्याच्यावर आरसीसीमध्ये घुमट असणार आहे. पुतळ्यासमोर 350 लोकांसाठी ओपन एअर थिएटर, स्टेजमागे एलईडी स्क्रीन, कलाकारांसाठी विश्रांती कक्ष, बगीचा कांस्य धातूचे उठाव शिल्प, भिंतीसाठी बांधकाम, जीआरसी कामामध्ये वाडा संकल्पना, पूर्ण परिसरासाठी पेन्सिल संकल्पनेतील सीमाभिंत, स्वच्छतागृह आदी बाबी निर्माण करून सुशोभीकरण केले जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती