साडेतीन कोटींच्या फसवणूक प्रकरणी दक्षिण कोरियातील कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरवर पुण्यात गुन्हा दाखल

शुक्रवार, 23 जुलै 2021 (08:27 IST)
दक्षिण कोरिया देशातील प्रसिद्ध बांधकाम कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरसह दोघांवर पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कंपनीने पुण्यातील एका व्यक्तीची तब्बल 3 कोटी 62 लाख 94 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
 
यु.सेउंग.सॅग.सा. इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर सेंग हवी (वय 53) आणि एक्सि डायरेक्टर सीओक हो चँग (वय 51) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सुशमेश ओमप्रकाश शर्मा (वय 51, सोलेश पार्क,बी.टी. कवडे रोड,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वर नमूद केलेल्या आरोपींनी फिर्यादी यांना M/s Housing India Pvt. ltd. (HIPL) या कंपनीसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे बांधकाम करण्याची व इंटिरियर काम करण्याची वर्क ऑर्डर दिली होती. हे काम त्यांनी फिर्यादी कडून पूर्ण करून घेतले आणि या कामाच्या बदल्यात होणारी 3 कोटी 62 लाख, 94 हजार 441 इतकी रक्कम फिर्यादीला न देता, तसेच त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कंपनीची कार्यालये त्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बंद करून निघून गेले आहेत असे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मुंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती