पिंपरी-चिंचवड महापालिका दिव्यांग कक्ष व रोटरी क्लब ॲाफ पिंपरी यांच्या सहकार्याने शहरातील 45 वर्षावरील दिव्यांगांसाठी स्वतंत्र कोविड 19 लसीकरण केंद्र रोटरी क्लब सभागृह संभाजीनगर, चिंचवड येथे (बुधवार) पासून सुरू करण्यात येणार आहे. शहरातील सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींनी या केंद्राचा लाभ घ्यावा असे, आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
लसीकरण केंद्रावर आकुर्डी रूग्णालयाच्या प्रमुख डॅा. सुनिता साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय पथक कार्यरत असणार आहे. कोविड लसीकरण हे सुरक्षित आहे. या माध्यमातून कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.