IND vs AUS World Cup Final: पुण्यात वर्ल्डकप जिंकण्यासाठी बाप्पाच्या चरणी साकडं

रविवार, 19 नोव्हेंबर 2023 (17:46 IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होतोय.
आज भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये फायनल आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकण्यासाठी स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्रमोदी स्टेडियम वर सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या आठ विकेट पडल्या आहेत. सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव क्रीजवर आहेत.
 
भारत हे विश्वचषक जिंकावे या साठी पुण्यात सरसबागेतील सिद्धिविनायक मंदिरात महाआरती करून बाप्पाला साकडं घातले आहे. भारतानं हा सामना जिंकावं आणि विश्वचषकावर भारताचं नाव कोराव ही इच्छा सर्व क्रिकेटप्रेमींची आहे. या साठी पुण्यात विविध ठिकाणी दुग्धाभिषेक आणि महाआरती करण्यात आली. विविध ठिकाणी स्क्रिनींग देखील करण्यात आले आहे. 
 




Edited by - Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती