पुणे बस दुष्कर्म प्रकरणानंतर सरकार कृतीत, २३ सुरक्षा रक्षक निलंबित, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही शिक्षा होणार

गुरूवार, 27 फेब्रुवारी 2025 (09:00 IST)
Pune Bus Rape News: महाराष्ट्रातील पुणे येथील स्वारगेट एसटी डेपोमध्ये मंगळवारी सकाळी एका २६ वर्षीय तरुणीवर बसमध्ये बलात्कार झाल्याची भयानक घटना उघडकीस आली. दत्तात्रय गाडे नावाच्या एका गुन्हेगाराने मुलीला फूस लावून अंधारात बसमध्ये नेल्याचा आरोप आहे. गुन्हा केल्यानंतर दत्तात्रेय घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारही अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करत स्वारगेट डेपोतील सर्व २३ सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
ALSO READ: राज्य सरकार दिव्यांगांना सक्षम बनवणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार पीडिता पुण्यातील एका रुग्णालयात समुपदेशक म्हणून काम करते. तसेच पोलिसांच्या ८ पथके आरोपीचा शोध घेत आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून महाराष्ट्र सरकार कृतीत आले. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी कडक कारवाई करत स्वारगेट डेपोमध्ये तैनात असलेल्या २३ सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले. याशिवाय, कर्तव्यावर असलेल्या आगार प्रमुख (सहाय्यक वाहतूक अधीक्षक) आणि आगार व्यवस्थापक यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. जर ते दोषी आढळले तर त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.
ALSO READ: नागपूर: महिलेचा संशयास्पद मृत्यू, मद्यपी मुलावर खूनाचा संशय
एसटीची महत्वाची बैठक
तसेच महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी महाराष्ट्र राज्य परिवहन (MSRTC) च्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिले आहे. या बैठकीत सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्णय घेतले जातील.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारपासून स्वारगेट बस डेपोमध्ये नवीन सुरक्षा रक्षक तैनात केले जातील.  
ALSO READ: रायगडमध्ये आठवीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती