संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) संचालक पदावर काम करत असलेल्या संचालकाला दहशतवादी विरोधी पथकाने कारवाई करत अटक केली आहे. डीआरडीओचे संचालक हे पाकिस्तानच्या इंटेलिजन्सच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेशनमध्ये सहभागी होऊन त्यांनी पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे आता दहशतवादी विरोधी पथकाने संचालकवर मोठी कारवाई केली आहे. एटीएसने त्यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.