पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू

बुधवार, 13 जुलै 2022 (21:54 IST)
पुणे जिल्ह्यात असलेल्या सर्वच धरणक्षेत्रात मोठा पाऊस झालाय. त्यामुळे धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. अशावेळी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर तरुणाई आणि नागरिक मोठी गर्दी करत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर प्रशासनाकडून कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आलीय. 14 ते 17 जुलै दरम्यान पर्यटन स्थळाच्या  1 किलोमीटर परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलीय. तसंच आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आलाय.
 
पुण्यात सुरू असलेल्या पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या 9 किमीच्या मार्गाला दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली आहे. मागील महिन्यात दरड कोसळून एका ट्रेकरचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, किल्ल्याला भेट देण्यास तात्पुरती बंदी आवश्यक आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती