कोरोना संसर्गाचा वेग मंदावतोय; नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या नागरिकांची संख्या अधिक

शनिवार, 15 मे 2021 (15:29 IST)
पुण्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होताना दिसत आहे. आजही नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात शहरात नव्याने 1 हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची तर 3 हजार 318 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे.
 
पुणे महापालिका हद्दीत नव्याने 48 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 7 हजार 611 इतकी झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या 23 हजार 692 रुग्णांपैकी 1381 रुग्ण गंभीर तर 6005 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
 
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 56 हजार 293  इतकी झाली आहे.  पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 24 हजार 990 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आज दिवसभरात 13908 इतके आतापर्यंत एकूण 23 लाख 40 हजार 210 जणांचे स्वॅब टेस्टसाठीचे नमुने घेण्यात आले.
 
तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती