दिलासादायक, पुण्यात कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 11 वरून 52 दिवसांवर

गुरूवार, 29 एप्रिल 2021 (07:55 IST)
पुण्यात दिलासादायक बाब समोर आली आहे. शहरातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 52 दिवसांवर गेला आहे. मागील महिन्यात हे प्रमाण 11 दिवसांपर्यंत आले होते. तर, गेल्या आठवड्यात हा कालावधीत 37 दिवसांचा होता.
 
शहरात 4 एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर 14 एप्रिलपासून राज्यशासनाने कठोर लॉकडाऊन लागू केले आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात लगेचच लॉकडाऊन आणखी कठोर करण्यात आले. शहरात शनिवार-रविवार वीकेंड लॉकडाऊन असून त्यात केवळ दूध विक्री आणि मेडिकल सुरू आहेत. त्याचा परिणाम दिसण्यास सुरूवात झाली असून, रुग्णवाढीचा वेग कमी होत आहे. पुढील काही दिवसांत हा कालावधी आणखी वाढेल असे आशादायक चित्र असेल, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती