कोरोनावर आयुर्वेदिक औषध, वाचा पुण्यातल्या डॉक्टरचा दावा

शनिवार, 3 एप्रिल 2021 (09:37 IST)
पुण्यातील कोथरुड येथील डॉ. सारंग फडके या डॉक्टरांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. हे औषध कोरोनावर 100 टक्के रामबाण उपाय असल्याच म्हटल आहे. महत्त्वाचं म्हणजे डॉ. फडके यांनी गेल्या वर्षीपासून आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना हे औषध देत असून, हे रुग्ण बरे झाल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी या औषधाबाबत आयुष मंत्रालयाशी संपर्क साधून, या औषधाची दखल घेण्याची विनंती केली आहे.
 
आतापर्यंत 100 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांना हे औषध दिले असून, ते 100 टक्के कोरोनामुक्त झाल्याचा दावा डॉ. फडके यांनी केला आहे.1 वर्षांच्या मुलापासून 78 वर्षांच्या पेंशटला हे औषध देण्यात आले आहे. या औषधाला मान्यता मिळावी म्हणून डॉ. फडके हे गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाशी पाठपुरावा करत आहेत. 
 
हे औषध आयुर्वेदिक असून त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसल्याचं डॉक्टरांचे म्हणणं आहे. त्यामुळे या औषधाला जर सरकारने मान्यता दिली तर कोरोना रुग्णांचा आकडा आणि मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल असं डॉ. सारंग फडके यांचं म्हणणं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती