मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचा आरडाओरडा ऐकून काही रस्त्यावरून जाणारे आणि स्थानिक लोक मदतीसाठी धावले. यामुळे घाबरून हल्ला करण्यासाठी आलेल्या तरुणाने दुचाकीवरून पळ काढला. सार्वजनिकरित्या घडलेल्या या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार तरुणी आरोपीशी बोलली नाही, म्हणून त्याने तिच्यावर हल्ला करण्याचा कट रचला. महेश सिद्धप्पा भंडारी (वय 22) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. भंडारी व त्याच्या साथीदाराविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.