पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्यानं संशय बळावला आहे. या अहवालात विजय चव्हाणही सोबत असल्याचा उल्लेख आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी अरुण राठोडची चौकशी करणार आहेत. याप्रकरणी एकूण तीन पथक चौकशी काम करत आहेत.