पुण्यातील येवलेवाडीच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिषेक प्रवीण शेळके(22) असे या मयत तरुणाचे नाव असून तो शिर्डी अहमदनगरचा राहणारा होता. तो पुण्यात शिक्षणासाठी आला असून अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला होता. मंगळवारी तो वसतिगृहात एकटाच असून संध्याकाळी त्याचे मित्र खोलीवर आल्यावर दार ठोठावल्यावर तो गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.