बुधागड शेत शिवरामध्ये ५९ वर्षीय शेतकऱ्याने दोरीच्या साह्याने निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ७ वाजता उघडकीस आली. बुधागड हे अमरावती जिल्ह्याच्या खोलापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गांव आहे. दादाराव बळीराम तानोळकर असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
दादाराव यांच्यावर कर्जाचा डोंगर असल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, या विंचनेतून त्यांनी गळफास लावून जीवन संपवले. सततच्या नापिकीमुळे ते निराश होते. मृतकाच्या नातेवाईकांनी थेट खोलापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीनुसार खोलापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.