पुणे मेट्रो प्रशासनाची विद्यार्थ्यांसाठी एक खास घोषणा, एक पुणे विद्यार्थी पासची घोषणा

शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (20:55 IST)
social media
पुणे मेट्रोकडून री वन पुणे विद्यार्थी पास या योजनेची घोषणा करण्यात आली होती. तर शुक्रवारपासून ही योजना राबवण्यात येणार आहे. पुणे मेट्रोकडून सुरुवातीला 10 हजार कार्ड मोफत देण्यात येणार आहे. ‘first-come, first-serve' या प्रमाणे हे कार्ड विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
 
पुणे मेट्रोचा पास मिळवण्यासाठी विद्यार्थी https://customerportal.hdfcbankonepune.in/eform/ या लिंकवर क्लिक करु शकतात. त्यानंतर या लिंकवर क्लिक केल्यानंतर माहिती भरु शकतात किंना QR कोड स्कॅन करून कोणत्याही मेट्रो स्टेशनवर कार्ड मिळवू शकतात. HDFC बँकेच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) द्वारे एक पुणे विद्यार्थी पास प्रीपेड असणार आहेत. या पासचा वापर करुन विद्यार्थी मेट्रोचा प्रवास सुलभ, जसद आणि सुरक्षित करु शकतात. त्याचबरोबर कॅशलेस व्यवहार करण्यासाठीही या पासचा वापर करण्यात येईल.
 
एक पुणे विद्यार्थी पास कार्ड घेण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे अधिकृत ओळखपत्र किंवा चालू शैक्षणिक बोनाफाईड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कार्ड घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तिकिट दरात 30 टक्क्यापर्यंत सवलत लागू करण्यात आली असून या कार्डची वैधता 3 वर्षे इतकी आहे.
 
पहिल्या 10,000 विद्यार्थ्यांना एक पुणे विद्यार्थी पास हे मोफत दिले जाणार आहे. त्यानंतर कार्डची किंमत 150 रुपये असेल. त्याचबरोबर पुणे मेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेला ई-फॉर्म भरुन एक पुणे विद्यार्थी पास मिळवू शकता.
 
'एक पुणे विद्यार्थी पास हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. याचा उद्देश हे केवळ विद्यार्थ्यांसाठी आर्थिकदृष्ट्यांबरोबरच सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान प्रवास होणे हे आहे. यामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष्य केंद्रित करता येईल. मेट्रोमुळं त्यांचा प्रवासाचा वेळ व खर्च दोन्ही वाचणार आहे. त्यामुळं या उरलेल्या वेळात त्यांना त्यांचे छंद जोपासता येतील, असं पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती