तब्बल 7 वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद होती. आता बैलगाडा शर्यत सुरु झाल्याने बैलगाडा शर्यत प्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. खरं तर बैलगाडा शर्यत हे बळीराजाच्या जीव की प्राण असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवर शेतकरी बांधवांचे प्रेम असते. सात वर्षे बैलगाडा शर्यत बंद असल्याने बैलगाडा प्रेमी नाराज होते. मात्र यंदा बैलगाडा शर्यत सुरु झाल्याने पुण्याच्या खेड तालुक्याततील चिंचोशी गावातील 75 वर्षीय मधुकर पाचपुते यांना खूप आनंद झाला. त्यांनी जल्लोषात येऊन जे काही केले ते सर्वाना थक्क करणारे आहे.
माणसाची इच्छाशक्ती दाणगी असेल तर तो काहीही करू शकतो. त्यासाठी वय देखील गौण असत. हे मधुकर पाचपुते यांनी केले आहे. त्यांना बैलगाडा शर्यत सुरु होण्याचा एवढा आनंद झाला की चक्क त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी जेव्हा या वयात माणूस अंथरुणावर खिळलेला असतो किंवा कोणाच्या आधाराशिवाय चालत नाही. त्यांनी या वयात चक्क मावळ तालुक्यात नानोली येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीत जल्लोषात घोड्यावर बसून आपल्या वयाला न बघता घोडेस्वारी केली आहे.
पाचपुते आजोबांचा घोडेस्वारीचा हा व्हिडीओ सोशल व्हिडिओवर व्हायरल प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये त्यांचा दाणगी उत्साह , त्यांना झालेला आनंद, त्यांच्यातील ऊर्जा दिसून येत आहे. त्यांचा हा पराक्रम तरुणांना लाजवणारा आहे. पण त्यांचा हा उत्साह खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या उत्साह आणि हिम्मतीचे खरोखर कौतुक करण्यासारखे आहे.