सर्व विषयात 35 गुण, टक्केवारीही 35

शनिवार, 18 जून 2022 (09:23 IST)
काल 17 जून रोजी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. निकालानंतर राज्यातील अनेक शाळांबाहेर जल्लोषाचे वातावरण दिसून आले. त्यातच पुण्यातील एका विद्यार्थ्याने सर्व विषयात 35 गुण मिळवले आहेत. शुभम जाधव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
 
"दहावीत 35 टक्के मिळवायला लक लागतं. पण पोलीस बनून पुढे देशसेवा करण्याचे माझे स्वप्न आहे. मला 50 ते 60 टक्क्यांची अपेक्षा होती. पण तेवढे मिळले नाहीत. मी पास झाल्याने समाधानी आहे," असं शुभमनं म्हटलं आहे.
 
"माझे मित्र 50 टक्क्यांच्या वर आहेत. पण मी त्यांच्यापेक्षा खाली असल्याचे थोडे दुःख वाटते. पण दहावीत 35 टक्के मिळवायला लक लागते." अशी प्रतिक्रिया शुभमने दिली आहे.

दरम्यान, शुभमची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल होताच, तेथील नागरिकांनी पुणेरी पगडी आणि पेढे देऊन शुभमचे अभिनंदन केले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती