राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक आहेस का आणि तुझी पुढची भूमिका काय असणार आहे असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत अभिजीत म्हणाला, गेल्या पंचवार्षिक राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी मोदी साहेबांनी मी पत्र लिहिलं होतं की मला तुम्ही राष्ट्रपती करा. तरूण वयात राष्ट्रपती व्हायचय, पण मी आता वेगळा मार्ग निवडला होता. काही आमदारांशी बोलत होतो आणि ती बातमी मीडिया पर्यंत पोहोलचली की मी १०० आमदारांच्या सह्यांचा प्रयत्न माझा सुरु आहे. आता याला किती यश येतय ते येत्या दोन दिवसांमध्ये कळेल. जर १०० सह्या मिळाल्या तर आपला अर्ज तिथे दाखल होईल, असं बिचुकले म्हणाला.