देशातील 11 नामांकित राष्टीय विधी महाविद्यालयात पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाते. वर्ष 2009च्या चालू वर्षाला प्रवेश घेण्यासाठी कॉमन लॉ टेस्ट (सीएलएटी) दि. 17मे रोजी घेतली जाणार आहे.
प्रवेश परीक्षाचे अर्ज 12 जानेवारीपासून सगळ्या केंद्रावर उपलब्ध केली जाणार आहेत. परीक्षार्थ्यांनी पूर्ण भरलेले अर्ज दि.10 एप्रिलपर्यंत संबंधीत केंद्रावर जमा करावयाची आहेत.
भोपाळसह देशातील 20 शहरात ही परीक्षा घेण्यात येणार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या निवडक शाखा तसेच प्रत्येक राष्ट्रीय विधी महाविद्यालयात प्रवेश परीक्षेचे अर्ज दि. 12 जानेवारीपासून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यंदाच्या वर्षी तीन महाविद्यालये वाढविण्याचा विचार शासनाने केला आहे. 2009 वर्षाच्या प्रवेश परीक्षेची संपूर्ण जबाबदारी हैद्राबाद येथील नाल्सार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ कडे सोपवण्यात आली आहे. 2010 मध्ये होणार्या सीएलएटीची जबाबदारी भोपाळ येथील नॅशनल इन्स्टीट्यूट युनिव्हर्सिटीला मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय विधी महाविद्यालयाची नावे:
1) नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगळूरू. 2) नाल्सार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, हैद्राबाद. 3) नॅशनल इन्स्टीट्यूट युनिव्हर्सिटी ऑफ भोपाळ. 4) नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, जोधपूर. 5) हिदायतुल्ला नॅशनल लॉ इन्स्टीट्यूट युनिव्हर्सिटी, रायपूर. 6) गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, गांधीनगर. 7) डॉ. राममनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, लखनऊ. 8) चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, पटना. 9) राजीव गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, पटीयाला. 10) बंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जूरीडीशियल सायंस, कोलकत्ता. 11) नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ अॅडव्हान्स लीगल स्टडीज, कोची.