जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवून देतो कुंभ स्नान

शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (11:59 IST)
कुंभ मेळा आस्थेचा पर्व आहे. श्रद्धालु पवित्र गंगेत डुबकी लावून आपले पाप आणि जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळवतात. हिंदू पौराणिक कथेनुसार, पृथ्वीवर फक्त  कुंभ मेळा एक अशी जागा आहे, जेथे तुम्ही तुमच्या पापातून मुक्त होऊ शकता. जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवू शकता.  
 
मान्यता अशी आहे की कुंभच्या दिवसांमध्ये पवित्र गंगेच्या पाण्यात डुबकी लावल्याने मनुष्य आणि त्याचे पूर्वज दोषमुक्त होऊन जातात. स्नान करून प्रत्येक व्यक्ती नवीन वस्त्र धारण करतात आणि साधुंचे प्रवचन ऐकतात. दोन मोठे कुंभ मेळ्याच्यामध्ये ऐक अर्धकुंभ मेळा देखील लागतो. यंदा प्रयागराजमध्ये कुंभ मेळा हा अर्धकुंभ आहे. संगम तटावरच ऋषि भारद्वाज यांचे आश्रम आहे, जेथे श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेसोबत वनवासच्या वेळेस येऊन थांबले होते. प्राचीनकाळात शंकराचार्य आणि   चैतन्य महाप्रभुदेखील कुंभ दर्शन करण्यासाठी गेले होते.  
 
कुंभ मेळ्यात येणारे नागा साधु सर्वात जास्त आकर्षणाचे केंद्र असतात. महाकुंभ, अर्धकुंभ किंवा सिंहस्थ कुंभानंतर नागा साधुंना बघणे फारच अवघड असते. नागा साधु बनण्यासाठी 10 ते 15 वर्षांपर्यंत कठिण तप आणि ब्रम्हचर्याचे पालन करावे लागते. आपल्या गुरुला विश्वासात घ्यावे लागते की ते आता साधु बनण्यालायक आहे. परिवार आणि समाजाचे त्यांना कुठलेही मोह नाही आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती