पी गोपीचंद

नाव : पुल्लेश्वर गोपीचंद
जन्म : १६ नोव्हेंबर १९७३
ठिकाण : नागंदल, आंध्र प्रदेश
देश : भारत
खेळ : बॅडमिंटन

बॅडमिंटनमध्ये भारताचे नाव जागतिक पातळीवर पोहोचवणारा खेळाडू पी. गोपीचंद. २००१ ची ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चँपियन्स या प्रति‍ष्ठित स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले त्यामुळे तो सर्वांच्या नजरेत आला. ही स्पर्धा जिंकणारा तो प्रकाश पदुकोण यांच्या नंतरचा दुसरा भारतीय आहे. शाळेपासून तो बँडमिंटन खेळत होता. वयाच्या दहाव्या वर्षापासून तो बॅडमिंटन खेळत होता. त्याच्या या कौशल्यामुळे त्याने सर्वांना ‍चकित केले होते. मात्र कारकिर्द भरात असतानाच त्याला दुखापतीनी घेरले. मात्र त्याने त्याच्यावर मात करून यशस्वी पुनरागमन केले.

पुरस्कार
२००० -०१ : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
२००५ : पद्मश्री पुरस्कार

वेबदुनिया वर वाचा