सफलतेची सप्तपदी

बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (11:40 IST)
यशस्वी होणं हे केवळ नशिबाने होत नसतं. त्यासाठी खूप मेहनत लागते. योग्य विचार करून पावलं उचलावी लागतात. त्याची योजना बनवावी लागते. उगाच उठून काही केलं आणि त्यात यश मिळालं असं सहसा होत नाही. जरी झालं तरी ते यश टिकत नाही. आता यश मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी त्याच्या सात पायर्यांनचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यात तुम्ही कुठे आहात हे तर कळेलच आणि आणखी किती पायर्या पार कराव्या लागतील याचाही अंदाज येईल.
 
योजना आखणे- आपल्या कोणत्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचं आहे हा प्रश्न आधी स्वतःला विचारा. मगच पुढचं पाऊल टाका. संधी आहे म्हणून एखादं क्षेत्र निवडण्यापेक्षा तुमची आवड आहे का हे आधी तपासा. तरच यशाची पुढची पावलं टाकणं सोपं होतं.
 
योग्यता तपासा- अनेकदा काही गोष्टींची आवड असते पण तेवढी योग्यता नसते. अशावेळी आपला कल तपासण्याइतकंच महत्त्व योग्यता असण्याकडेही द्या. ती नसेल तर ती मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी कोणाचं मार्गदर्शन घेता येईल याची चाचपणी करा.
 
साहस - यश मिळवताना ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. अनेकदा असे काही निर्णय घ्यायची वेळ येते जेव्हा सगळं काही तुमच्या धाडसावरच अवलंबून असतं. पण ‘डर के आगे जीत है' हे लक्षात ठेवलं तर यशाची ही पायरीही सहज ओलांडली जाईल.
 
संवाद- तुम्हाला ज्या क्षेत्रात नाव मिळवायचं आहे त्या क्षेत्रातल्या लोकांशी तुमचा संवाद असणं गरजेचं आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग म्हणूनही तुमचं संवादकौशल्य पणाला लागतं. त्यामुळे त्यात माहिरत मिळवणं गरजेचंच.
 
व्यक्तिमत्व - चांगलं व्यक्तिमत्व ही दैवी देणगी असली तरी स्वभावाने लोकांना आपलंसं करणं ही कला तुम्ही जरूर आत्मसात करू शकता. तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही कसे वागता यावरही बरंच काही अवलंबून असतं तेव्हा आपलं फर्स्ट इंप्रेशन चांगलं असेल याकडे लक्ष द्याच.
 
आत्मविश्वास- यशाच्या शिडीतली ही आणखी एक पायरी. तो बर्या च गोष्टींनी येतो. काहीवेळा विषयातील अभ्यासाने तर कधी सरावाने. तो कसा मिळवायचा किंवा कसा दाखवायचा याच्या टिप्सही आजकाल भरपूर मिळतात. त्यांचा एकदाविचार करायला हरकत नाही.
 
समाधान- ही शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. कारण आपल्या यशाचे मानदंड आपणच ठरवायचे असतात. ते दुसर्यांचना ठरवू देऊ नका आणि दुसर्यां शी तुलना करून आहे ते समाधान घालवूही नका. मग जीवनात येणारा आनंद खूप काळ टिकणारा असेल.
मानसी जोशी

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती