भारतातील सर्वात महागड्या शाळा, लाखो रुपये आहे वार्षिक फीस

मंगळवार, 11 एप्रिल 2017 (16:18 IST)
प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की त्यांच्या मुलांनी चांगल्या शाळेत अभ्यास केला पाहिजे. आजकाल अभ्यासात कॉम्‍पिटीशन एवढी वाढली आहे की कोणती शाळा तुमच्या मुलांसाठी किती योग्य आहे हे निश्चित करणे फारच कठीण कार्य असते. एवढंच नव्हे तर आमच्या देशात काही शाळा एवढ्या महाग आहे की सामान्य व्यक्तींसाठी त्या शाळेत आपल्या मुलांना शिक्षण देणे शक्य नसते. येथे मुलांच्या प्रत्येक सुविधांकडे लक्ष दिले जाते म्हणूनच या शाळांचे नाव टॉप शाळांमध्ये घेतले जातात. या शाळांची फीस एवढी आहे की तुम्ही ऐकूनच हैराण व्हाल. तर तुम्हाला सांगत आहोत या महागड्या शाळांबद्दल..।।  
दून स्‍कूल (Doon School, Dehradun) – 
 
ही शाळा भारतातील टॉप शाळांमध्ये सामील आहे. या शाळेला दून वेलीमध्ये 1929 साली सुरू करण्यात आले होते. ही शाळा फक्त मुलांसाठी आहे. येथे देशातील काही अमीर घराण्यातील मुलांनी शिक्षण घेतले आहे. राहुल गांधी, राजीव गांधी, हीरो ग्रुपचे सुनील मुंजाल आणि पवन मुंजाल यात सामील आहे.   
 
फीस – या शाळेची फीस 9.7 लाख रुपए वार्षिक आहे. 25 हजार टर्म फीस आहे. अॅडमिशनच्या वेळेस येथे 3,50,000 रुपए सिक्युरिटीच्या स्वरूपात जमा करायचे असतात, जो रिफंडेबल असतात. वनटाइम ऍडमिशन फीस 3.5 लाख रुपए द्यावी लागते. 
 
सिंधिया स्कूल (Scindia School, Gwalior)-
सिंधिया स्कूलला 1897 मध्ये ग्वालियरमध्ये उघडण्यात आले होते. या शाळेला तेव्हाचे महाराज माधव राव सिंधिया यांनी सुरू केले होते. येथून बॉलीवूडचे बरेच स्टार्सने अभ्यास केला आहे. त्यात सलमान खान आणि अनुराग कश्यप प्रमुख आहे. त्याशिवाय रिलायंस इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानीने देखील या शाळेतून अभ्यास केला आहे.  
 
फीस – सिंधिया शाळेची वार्षिक फीस किमान 7,70,800 रुपए आहे.
मायो कॉलेज (Mayo College, Ajmer) –
 
ही शाळा राजस्थानच्या अजमेरमध्ये आहे. ही ब्यॉयज रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल आहे, ज्याला 1875 मध्ये तयार करण्यात आले होते. ही भारतातील सर्वात जुने बोर्डिंग शाळांपैकी एक आहे. येथे 9 होल गोल्‍फ कोर्स आणि पोलो ग्राउंड आहे.  
 
फीस – येथील वार्षिक फीस किमान 5.14 लाख रुपए आहे.
इकोल मोंडिएल वर्ल्ड स्कूल (École Mondiale World School, Mumbai) –
 
ही शाळा IB प्राय मरी इयर्स प्रोग्राम, मिडल ईयर्स प्रोग्राम आणि डिप्लोमा प्रोग्रामसाठी आहे. हे ग्रेड 9 आणि 10 साठी IGCSE पण ऑफर करतो.  
 
फीस – येथील वार्षिक फीस किमान 10.9 लाख रुपए आहे.
वेलहम ब्यॉयज स्कूल (Welham Boys’ School, Dehradun) –
 
ही शाळा 30 एकर मध्ये पसरलेली आहे. येथे मोठ्या नेत्यांनी अभ्यास केला आहे. त्यात माजी केंद्रीय मंत्री मणि शंकर अय्यर, ओडिशाचे सीएम नवीन पटनायक पंजाबचे सीएम कॅप्टन अ‍मरिंदर सिंह आणि विक्रम सेठ सारख्या दिग्गजांनी अभ्यास केला आहे. येथूनच वरुण गांधी यांचे वडील संजय गांधींनी देखील अभ्यास केला होता. 
 
फीस – येथील वार्षिक फीस किमान 5.7 लाख रुपये आहे. त्या शिवाय ट्यूशन समेत इतर सुविधांसाठी अतिरिक्त 1लाख रुपए मोजावे लागतात.  
वुडस्टॉक स्कूल (Woodstock School, Mussoorie) –
ही एक को-एड बोर्डिंग शाळा आहे. ही शाळा मसुरीमध्ये आहे. येथे अॅक्टर टॉम अल्‍टर आणि रायटर नयनतारा सहगल यांनी शिक्षण घेतले आहे.  
 
फीस –  वार्षिक फीस किमान 15.9 लाख रुपए आहे. येथे अॅडमिशनच्या वेळेस 4 लाख रुपए द्यावे लागतात, जे नॉन-रिफंडेबल असतात.  
गुड शेफर्ड स्कूल (Good Shepherd School, Ooty) –
उटीचे हे एक फुल टाइम रेजिडेंशियल स्कूल आहे. नीलगिरी पर्वतांवर वसलेले या शाळेचे कँपस 70 एकर जागेत पसरलेले आहे.  
फीस – 10 लाख रुपयांपर्यंत (वार्षिक). 

वेबदुनिया वर वाचा