झटपट बनवा Bread Omelette Recipe

बुधवार, 16 एप्रिल 2025 (14:06 IST)
साहित्य-
ब्रेड-तीन 
कच्ची अंडी-दोन 
चवीनुसार मीठ
कांदा-एक बारीक चिरलेला 
हिरवी मिरची-दोन बारीक तुकडे केलेली 
कोथिंबीर 
बेकिंग सोडा चिमूटभर 
अजिनोमोटो-दोन दाणे
भाजलेले जिरेव 
चाट मसाला 
तेल 
ALSO READ: चिकन नगेट्स रेसिपी
कृती-
सर्वात आधी एका भांड्यात दोन अंडी फोडा. चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबिरीर घाला आणि चमच्याने चांगले फेटून घ्या किंवा मिक्स करा. अंडी चांगली फेटली की त्यात मीठ, चाट मसाला, अजिनोमोटो, भाजलेले जिरे आणि बेकिंग सोडा चवीनुसार घाला आणि एकदा चांगले मिसळा जेणेकरून सर्व मसाले सर्वत्र चांगले मिसळतील. आता एक पॅन घ्या आणि गॅसच्या आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यावर त्यात एक चमचा तेल घाला आणि ते तेल संपूर्ण पॅनवर पसरवा. तेल गरम झाल्यावर ब्रेडला एकदा उलटून अर्धा मिनिट तळा. ब्रेड शिजल्यावर ती एका प्लेटमध्ये काढा. आता पॅनवर आणखी एक चमचा तेल घाला आणि तेल गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यावर, अंड्याचे मिश्रण तव्यावर गोलाकार पसरवा. अंडी तव्यावर पसरल्यानंतर, आच मध्यम करा आणि ब्रेड अंड्यांवर ठेवा जेणेकरून अंड्याचे मिश्रण ब्रेडच्या एका बाजूला लागेल आणि नंतर ब्रेड उलटा करा. ब्रेड उलटल्यानंतर, आमलेट मध्यम आचेवर अर्धा मिनिट शिजवा, नंतर ते उलटून एक मिनिट शिजवा. ऑम्लेट दोन्ही बाजूंनी शिजल्यावर गॅस बंद करा. आता ब्रेड आणि ऑम्लेट गोळा करा, ते कापून घ्या, व त्यावर चाट मसाला घाला.  तर चला तयार आहे ब्रेड आम्लेट रेसिपी, सॉससोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: स्पाइसी गार्लिक बटर चिकन रेसिपी
Edited By- Dhanashri Naik 
 ALSO READ: झटपट बनणारा ब्रेकफास्ट Egg Fried Rice रेसिपी

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती