फिनटेक क्षेत्रातल्या करिअरविषयी...

शनिवार, 5 डिसेंबर 2020 (13:50 IST)
अलीकडच्या काळातप्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. अर्थविश्वही याला अपवाद नाही. या क्षेत्रात वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानाला फायनान्शियल टेक्नॉलॉजी असे म्हटले जाते. ‘फिनटेक' असे याचे लघुरूप आहे. सतत समोर येणारे नवे तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीचे वाढते प्रमाण यामुळे फिनटेकमध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत. ही अर्थविश्वातली वेगळी वाट म्हणता येईल. फिनटेक क्षेत्रातल्या करिअरविषयी...
 
जगभरातील फिनटेक क्षेत्रात कुशल तज्ज्ञांची आवश्यकता भासते आहे. अनुभवी आणि या क्षेत्रात काम करण्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्ये असणार्या युवकांना चांगला पगार देण्याची कंपन्यांची तयारी आहे. बँकिंग, आर्थिक सेवा आणि विमा या क्षेत्रांवर फिनटेकचा सर्वाधिक प्रभाव असला तरी पेमेंट्‌स, रिटेल बँकिंग, पर्सनल फायनान्स, डेब्ट फायनान्सिंग, इक्विटी क्राउडफंडिंग, फायनान्शियल रिसर्च, असेट मॅनेजमेंट, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट आदी क्षेत्रांमध्ये फिनटेक तज्ज्ञांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.
 
फिनटेकचे विविध पैलू आहेत. त्यापैकी एक म्हणजे ब्लॉकचेन तंत्रज्ञान. ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे अत्यंत आकर्षक आणि अनोखे असे कार्यक्षेत्र आहे. आर्थिक क्षेत्रावर या तंत्रज्ञानाची मक्तेदारी आहे.व्यवसायाशी संबंधित समस्या, अडचणींची जाण असणार्यार, या समस्यांवर उपाय शोधून काढणार्यार तसेच व्यापार आणि तंत्रज्ञान यामधल्या संवादाची पोकळी कमी करणार्या तज्ज्ञांना वाढती मागणी आहे. 
 
डाटा सायंटिस्ट किंवा डाटा अॅसनालिस्ट्‌सना उत्तम पगार देण्याची कंपन्यांची तयारी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या क्षेत्रात कुशल तज्ज्ञांची कमतरता आहे. इंटरनेट ऑफ थिंग्जमध्येही तुम्ही करिअर करू शकता. चीफ डिजिटल ऑफिसर आणि चीफ डिजिटल इन्फॉर्मेशन ऑफिसर अशी पदे कंपन्यांमध्ये उपलब्ध आहेत. नवनव्या संकल्पना आणि फिनटेकशी संबंधित इतर माध्यमांचा आधार घेऊन डिजिटल बिझनेसची धोरणे आखण्याची जबाबदारी या तज्ज्ञांवर असते.
अभय अरविंद

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती