करियर करताना आवश्यक टिप्सॅ

शनिवार, 23 ऑगस्ट 2014 (17:43 IST)
कधीही फार तास सलग अभ्यासाला बसू नये. तासाभराने दहा मिनिटांचा ब्रेक घ्यावा.
 
सर्वात प्रथम अभ्यासासाठी टाइम टेबल बनवा. त्या टाइम टेबलचे काटेकोरपणे पालन करा. जर तुम्हाला लक्षात राहणार नसेल तर ते टाइम टेबल तुमच्या डोळय़ाला दिसेल अशा ठिकाणी लावावे, जेणेकरून ते पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल.
 
अभ्यास करताना पाठांतर न करता प्रथम प्रश्न व उत्तर नीट वाचा. समजून घ्या व ते समजल्यानंतर तुमच्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करा. यामुळे ते तुमच्या लक्षात राहील व पाठांतर करण्याची गरज नाही. 
 
वाचल्यानंतर एकदा ते हाताखालून गेले पाहिजे. म्हणजेच तुम्ही काय वाचलं ते बघून लिहा; पण एकदा तरी लिहा. त्यामुळे कधी कधी वाचलेले लक्षात राहत नाही; पण लिहिलेले राहते.
 
फ्रेश वातावरण असलेल्या ठिकाणी अभ्यासाला बसा.
 
वीकेण्डला स्वत:ची परीक्षा घेऊन पुस्तकांप्रमाणे चेक करा किंवा पालकांना चेक करायला सांगा. त्यामुळे तुमचा सराव किती झाला हे तुम्हाला कळेल.
 
वाचताना महत्त्वाची वाक्ये, शब्द, लाइन अधोरेखित करून ठेवत जा, म्हणजे जेव्हा कधी तुम्ही पुस्तक चाळाल तर तुम्हाला ते वाचलेले पटकन लक्षात येईल.
 
ररोज १५ मिनिटांचा वेळ उजळणीसाठी ठेवावा. 
 
दहावी किंवा १२वीच्या विद्यार्थ्यांनी सुट्टय़ामध्ये अभ्यासक्रमाची पुस्तके चाळावीत म्हणजे नवीन अभ्यासक्रम असल्यास डोळ्याखालून गेल्याने तुम्ही पुन्हा वाचाल तेव्हा ते तुम्हाला पटकन समजेल.
 
१५वीच्या विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्‍चित करावे व त्या ध्येयानुसार अभ्यास करून गुण प्राप्त करावे. तसेच जे क्षेत्र निवडायचे असेल त्याची पूर्वमाहिती असणे आवश्यक आहे. यासाठी त्या गोष्टीची सुट्टय़ामध्येच जमवाजमव करावी.

आपल्या घरातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील १0वी, १२वी, १५वीच्या विद्यार्थ्यांना सर्वच जण सल्ला देत फिरत असतात. मात्र हा विचार कोणी करत नाही की त्यांच्यावर या फुकटच्या सल्ल्याचा काय परिणाम होत असेल. यासाठी आपल्या पाल्याला या टिप्स वाचायला सांगा ज्यामधून त्याला स्वत:ला कळेल की काय केले पाहिजे. 

वेबदुनिया वर वाचा