दुटप्पीपणानेच घेतला मुशर्रफ यांचा बळी

एएनआय

मंगळवार, 19 ऑगस्ट 2008 (17:24 IST)
एकावेळी अमेरिकेलाही जवळ करायचे आणि त्याचवेळी कट्टरपंथीयांनाही दूर लोटायचे नाही, या दुटप्पी धोरणानेच मुशर्रफ यांच्यावर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी मोहिमेचा साथीदार बनला होता. पण त्याचवेळी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयचे तालिबानी अतिरेक्यांशी संबंधही पूर्वीसारखेच होते, असे न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

''मुशर्रफ यांनी शरीफ यांचे सरकार उलथवून सत्ता हाती घेतली तेव्हा अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. विशेषतः मदरशांचा प्रसार व त्यातून दिले जाणारे धार्मिक शिक्षण आणि त्यातूनच निर्माण होणारे अतिरेकी हे सगळे रोखण्यासाठी मुशर्रफ पुढाकार घेणार होते. पण त्यांनी मदरशांना हातही लावला नाही. त्यांनी याची सगळी जबाबदारी धार्मिक खात्याकडे दिली. पण या खात्याने मदरशांवरील कारवाईला नकार दिला, असे मुशर्रफ यांच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री असलेल्या जहांगीर तरीन यांनी सांगितले.

मुशर्रफ यांच्या कार्यपद्धतीत एक ठळक दोष होता, तो म्हणजे ते लोकशाही मार्गाच्या व नागरी राजकारणाचा तिरस्कार करत होते, असे मत तरीन यांनी नोंदविले.

वेबदुनिया वर वाचा