नेहमीच मुशर्रफ यांच्या कामाची तरफदारी करणाऱ्या डेमोक्रेटीक पक्षाने आता त्यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे.
मुशर्रफ हे लोकशाही मार्गाने निवडून आले नसल्याने त्यांच्या सारख्या नेत्याला आता ब्लॅक चेक देणे अमेरिकेला परवडणार नसल्याचे मत राष्ट्राध्यक्ष पदाचे डेमोक्रेटीक पक्षाचे दावेदार बराक ओबामा यांनी व्यक्त केल्याने मुशर्रफ समर्थकांना चांगला धक्का बसला आहे.
मुशर्रफ यांच्यावर ओबामा यांनी सुरवातीपासूनच टीकेची झोड केल्याने ओबामा यांचे हे वक्तव्य फारसे महत्त्वाचे नसल्याचे मत ओबामा विरोधकांनी व्यक्त केले आहे.
डेमोक्रेटीक पक्षाने आपल्या 2008 च्या राष्ट्रीय निवडणूक संमेलनातील प्रस्तावात मुशर्रफ आणि पाकिस्तानावर टीकेची झोड उडवली आहे.
मुशर्रफ यांच्यावर त्यांच्या देशातच महाभियोग चालवला जात असताना आता त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचां असा सवालच या प्रस्तावात उपस्थित करण्यात आला आहे.
पाकच्या कबायली भागातूनच अमेरिकी सैन्यांना जास्त धोका असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.