एआर. रहमान यांना ऑस्कर

संगीतकार एआर. रहमान यांना ऑस्कर पुरस्कार जाहीर होताचा भारतात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पुरस्कार घेताना भावनावश झालेल्या रहमान यांनी आपली आईविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

रहमान यांच्या रूपाने भारताला पहिल्यांदाच स्पर्धात्मक श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे. यापूर्वी सत्यजित राय यांना लाईफटाईम अचिव्हेमेंटसाठी ऑस्कर मिळाला होता. तसेच गांधी चित्रपटाच्या वेशभूषेसाठी भानू अथय्या यांना ऑस्कर मिळाले होते. चित्रपटांमध्ये मदर इंडिया, सलाम बॉम्बे, लगान हे चित्रपट ऑस्करपर्यंत पोहोचले होते. पण त्यापैकी एकालाही ऑस्कर मिळाले नव्हते.

रहमान यांच्या जय हो या गाण्यासाठी व ओरीजिनल स्कोरसाठी असे दोन ऑस्कर मिळाले आहेत. जय हो या गाण्यासाठी गुलझार यांचेही नामांकन होते. याशिवाय रेसुल पुकुट्टी या भारतीयला स्लमडॉग मिलिनियरसाठीच इतर दोघांसह साऊंड मिक्सिंगसाठीही ऑस्कर मिळाले आहे.


रहमान यांच्या रूपाने भारतीय संगीताचा सन्मान झाला आहे. ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी रहमान यांनी जय हो आणि साया ही याच चित्रपटातील दोन गाणीही सादर केली. ऑस्करच्या रंगमंचावर कदाचित पहिल्यांदाच हिंदी गाणी गायली गेली असावीत. रहमान यांनी पुरस्कार स्वीकारताना हिंदी चित्रपटात मेरे पास मॉं है असा डॉयलॉग असतो, असे सांगून आता आपल्याकडे ऑस्कर आहे, असे सांगता येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

वेबदुनिया वर वाचा