ऑस्कर 2024 : ‘ओपनहायमर’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; पाहा संपूर्ण यादी

सोमवार, 11 मार्च 2024 (10:26 IST)
अमेरिकेतील लॉस एंजेलिस या ठिकाणी पार पडलेल्या सोहळ्यात ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित ओपनहायमर चित्रपटाचाच वरचष्मा पाहायला मिळाला.
 
यावर्षी बार्बी, ओपनहायमर, किलर ऑफ द फ्लॉवर मून या चित्रपटांची चर्चा होती. पण आज ओपनहायमरने बाजी मारली.
 
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला सर्वाधिक 13 नामांकनं मिळाली होती. त्यापैकी 7 पुरस्कार या चित्रपटाने आपल्या नावे केली आहेत.
 
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने पटकावला आहे. ख्रिस्तोफर नोलनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नोलानला देखील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
 
या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
 
मर्फीने जगभरात शांततेसाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा पुरस्कार समर्पित केला आहे.
 
तसंच ओपनहायमर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग, सर्वोत्कृष्ट म्युझिक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता (सिलियन मर्फी), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (रॉबर्ट डाउनी जूनियर) हे पुरस्कार मिळाले.
 
या सोहळ्यात 'ओपनहायमर'नेच ऑस्कर पुरस्कारांचं खातं उघडलं.
 
ख्रिस्तोफर नोलन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार घेण्यासाठी आले तेव्हा स्टीव्हन स्पीलबर्गने त्यांना ट्रॉफी दिली.
 
यावेळी नोलन यांनी त्यांची पत्नी आणि या चित्रपटाची सहनिर्माती एम्मा थॉमस यांचे आभार मानले.
 
त्यांनी आपल्या पत्नीला 'त्यांच्या सर्व चित्रपटांची आणि सर्व मुलांची निर्माती' असं म्हटलं.
 
तर एम्मा थॉमसने आपल्या पतीचे वर्णन 'अद्वितीय आणि अद्भुत' असे केले. मात्र, उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय त्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला दिलं.
भारताच्या पदरी निराशा
'टू किल अ टायगर' या भारतीय माहितीपटाला 'बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म' या श्रेणीत नामांकन मिळालं. पण या श्रेणीत 'ट्वेंटी डेज इन मारियुपोल' या डॉक्युमेंट्री फिचर फिल्मने हा पुरस्कार पटकावला आहे.
 
युक्रेनियन चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वांत पहिला ऑस्कर पुरस्कार आहे.
 
हा पुरस्कार पटकावताना दिग्दर्शकांनी रशिया-युक्रेनच्या युद्धाचा उल्लेख केला.
 
या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शक युक्रेनियन पत्रकार मस्तिस्लाव्ह चेरनोव्ह यावेळी म्हणाले, "मला ही डॉक्युमेंट्री कधीच बनवायची नव्हती आणि या स्टेजवर येऊन असं म्हणणारा कदाचित मी पहिलाच दिग्दर्शक असावा."
 
मार्च 2022 मध्ये रशियाने आक्रमण केल्यानंतर युक्रेनमधील मारियुपोल येथे 20 दिवस राहून चेरनोव्ह यांनी ही डॉक्युमेंट्री तयार केली आहे.
 
"सिनेमा आठवणी बनवतो आणि आठवणी इतिहास घडवतात," असंही त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
 
इतर पुरस्कार
ओपनहायमरच्या रॉबर्ट डाउनी ज्युनियरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार 'द होल्डओव्हर्स'मधील अभिनेत्री जॉय रँडॉल्फ हिला देण्यात आला.
'पुअर थिंग्स' या चित्रपटाने सलग तिसरा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. 'बेस्ट कॉस्च्युम डिझाइन' या श्रेणीत होली वॅडिंग्टनने हा पुरस्कार आपल्या नावे केला.
बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्मचा पुरस्कार युनायडेट किंग्डमच्या 'द झोन ऑफ इंटरेस्ट'ला मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट साऊंडसाठी ‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ला ऑस्कर पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट 'ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार 'वॉर इज ओव्हर! इन्स्पायर्ड बाय द म्युझिक ऑफ जॉन अँड योको'ने पटकावला.
सर्वोत्कृष्ट गाण्याचा ऑस्कर पुरस्कार 'बार्बी'ला
बेस्ट ओरिजिनल स्क्रिनप्लेचा ऑस्कर 'ॲनाटॉमी ऑफ अ फॉल'ला देण्यात आला. आर्थर हरारी आणि जस्टीन ट्रेट यांनी या चित्रपटाच्या स्क्रिनप्लेचं लेखन केलं आहे.
गाझावरील युद्धात अमेरिकेने इस्रायलला दिलेल्या पाठिंब्याच्या विरोधात सुमारे एक हजार निदर्शकांनी ऑस्कर सोहळ्याच्या परिसरात आंदोलन केलं.
 
सर्वोत्कृष्ट चित्रपट
विजेता - ओपनहायमर
 
नामांकने
 
अमेरिकन फिक्शन
अॅनॉटॉमी ऑफ अ फॉल
बार्बी
द होल्डओव्हर्स
मेस्टरो
पास्ट लाइव्हस
पुअर थिंग्स
द झोन ऑफ इंटरेस्ट
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
विजेती - एमा स्टोन - पुअर थिंग्स
 
नामांकने
 
अॅनेट बेनिंग - न्याड
 
लिली ग्लॅडस्टोन - किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
 
सॅंड्रा हुलर - अॅनाटॉमी ऑफ अ फॉल
 
केरी मुलिगन - मेस्टरो
 
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती