पॅरिस पॅरालिम्पिक 2024: ॲथलेटिक्सच्या उंच उडी T64 स्पर्धेत प्रवीण कुमारने सुवर्णपदक जिंकले, भारताच्या पदकांची संख्या 26 झाली
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (17:59 IST)
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 गेम्समध्ये ॲथलेटिक्सच्या उंच उडी T64 स्पर्धेत प्रवीण कुमारने सुवर्णपदक जिंकले. या पॅरालिम्पिकमधील भारताच्या पदकांची संख्या आतापर्यंत 26 झाली आहे.हे पॅरालिम्पिक भारतासाठी आतापर्यंत सर्वच अर्थाने सर्वोत्कृष्ट पॅरालिम्पिक ठरले आहे. भारतासाठी पदकांची सुरुवात अवनी लेखराने केली. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये 84पॅरा ॲथलीट भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. 8 सप्टेंबरपर्यंत या खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक भारतासाठी सर्वात यशस्वी पॅरालिम्पिक ठरले आहे. टोकियो पॅरालिम्पिक 2020 हे याआधी भारताचे सर्वात यशस्वी पॅरालिम्पिक ठरले होते. त्यात भारताने 54 खेळाडू पाठवले होते आणि 19 पदके जिंकण्यात ते यशस्वी ठरले होते. यामध्ये पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य पदकांचा समावेश होता. भारताने 20 वे पदक जिंकताच टोकियो पॅरालिम्पिकचा विक्रम मोडला. आता सहावे सुवर्ण जिंकून भारताने टोकियोचा पाच सुवर्णांचा विक्रमही मोडला.भारत सध्या 14 व्या क्रमांकावर आहे.