भारतीय नेमबाज आणि ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राला पॅरिसमधील प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) 142 व्या सत्रात बिंद्राचा गौरव करण्यात आला. ऑलिम्पिक ऑर्डर हा IOC कडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. बिंद्रापूर्वी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही हा सन्मान मिळाला होता. ऑलिम्पिक खेळांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
41 वर्षीय बिंद्राने 2008 बीजिंग गेम्समध्ये पुरुषांची 10 मीटर एअर रायफल स्पर्धा जिंकून भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. ते 2010 ते 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (ISSF) च्या ऍथलीट समितीचे सदस्य होते. 2014 पासून ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 2018 पासून ते IOC ऍथलीट्स कमिशनचे सदस्य आहेत.
ऑलिम्पिक ऑर्डर हा IOC चा सर्वोच्च पुरस्कार आहे, जो ऑलिम्पिक चळवळीतील विशिष्ट योगदानासाठी दिला जातो.त्याचे नामांकन ऑलिम्पिक ऑर्डर कौन्सिलद्वारे प्रस्तावित केले जाते आणि कार्यकारी मंडळाद्वारे त्यावर निर्णय घेतला जातो.